त्यामुळे मोदी जनतेला छळतात, राज ठाकरेंचं व्यंगचित्र!

त्यामुळे मोदी जनतेला छळतात, राज ठाकरेंचं व्यंगचित्र!

मुंबई – काँग्रेसने मोदींना छळले, म्हणून मोदी जनतेला छळत असल्याचा टोला राज ठाकरे यांनी व्यंगचित्रातून लगावला आहे. गुजरातचा मुख्यमंत्री असताना मला काँग्रेसने छळले होते, असे मोदींनी म्हटले होते. त्यामुळेच ते आता जनतेला छळत असल्याचं राज यांनी व्यंगचित्रातून म्हटलं आहे.

दरम्यान भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत नरेंद्र मोदींनी काँग्रेसला लक्ष्य केले होते. देशाची मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळातील वर्षे वाया गेली आणि भ्रष्टाचार करता यावा म्हणून अनेकांना अशक्त सरकार हवे असते, अशा शब्दात त्यांनी काँग्रेसवर टीका केली होती.तसेेच गुजरातचा मुख्यमंत्री असताना काँग्रेसने माझे पाय खेचण्याचा प्रयत्न केला. माझ्यावर वाटेल ते आरोप करुन माझा छळ करण्यात आला.  या विधानाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी हे व्यंगचित्र रेखाटले आहे.

COMMENTS