दिल्ली विधानसभा निवडणूक, भाजप उमेदवारांची पहिली यादी जाहीर!

दिल्ली विधानसभा निवडणूक, भाजप उमेदवारांची पहिली यादी जाहीर!

नवी दिल्ली – दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने उमोदवारांची यादी जाहीर केली आहे. येत्या 8 फेब्रुवारी रोजी 70 जागांसाठी दिल्ली विधानसभेची निवडणूक होणार आहे. याचा निकाल 11 फेब्रुवारीपर्यत घोषित करण्यात येणार आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने आपल्या 70 उमेदवारांची यादी एकाच वेळी जाहीर केली आहे. त्यानंतर भाजपने उमेदवारांची यादी जाहीर केली असून काँग्रेस पक्षाने अद्याप त्यांच्या उमेदवारांची यादी जाहीर केलेली नाही. भाजपने एकूण 57 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.

भाजप उमेदवारांची यादी

दरम्यान दिल्ली, महाराष्ट्र, उत्तरप्रदेश या राज्यांमधील निवडणुका सत्तेच्या दृष्टीने महत्त्वाच्या असल्याने राजकीय पक्ष या राज्यांमध्ये आपली सत्ता यावी यासाठी पुरेपुर प्रयत्न करतात. दिल्लीतील विधानसभा निवडणुकीत 70 जागांसाठी तब्बल 13,750 मतदान केंद्र उभारण्यात येणार आहे. निवडणुकीच्या कामासाठी 90 हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ज्यांना मतदान केंद्रावर येणं शक्य नसेल अशा ज्येष्ठ व्यक्तींसाठी पोस्टाने मतदान करता येणे शक्य आहे. मात्र यासाठी पाच दिवसांपूर्वी अर्ज करणे अनिवार्य आहे.

COMMENTS