2012 मध्ये सरकारनं घेतलेला ‘तो’ निर्णय बदलणार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांचं वक्तव्य!

2012 मध्ये सरकारनं घेतलेला ‘तो’ निर्णय बदलणार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांचं वक्तव्य!

रत्नागिरी – शासनाने 2012 साली ग्रंथालयांना मान्यता देण्यात येऊ नये असा निर्णय घेतला होता तो निर्णय बदलून आता मान्यता सुरू करण्यात येईल असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले. मालगुंड येथे कवी केशवसुत स्मारक सभागृहात आयोजित अखिल भारतीय मराठी विज्ञान संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघाचे खासदार विनायक राऊत यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

या संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर हेमचंद्र प्रधान स्वागताध्यक्ष मधू मंगेश कर्णिक कोकण मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष ज्येष्ठराज जोशी रत्नागिरीचे नगराध्यक्ष प्रदीप साळवी आदींची या वेळी प्रमुख उपस्थिती होती
2012 च्या एका निर्णया द्वारे नव्या ग्रंथालयांना मान्यता देणे बंद करण्यात आले होते. आज या केशवसुत स्मारकात होणाऱ्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने नव्या ग्रंथालयांना मान्यता देण्याचे काम सुरू करण्यात येईल अशी घोषणा उदय सामंत यांनी यावेळी केली.

कोकण हे बुद्धिवंतांची भूमी आहे या भूमीने अनेक भारतरत्न दिले अशा या भूमीचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी मला मिळाली हे माझे भाग्य मी समजतो असे यावेळी खासदार विनायक राऊत यांनी आपल्या भाषणात सांगितले
तीन दिवस चालणाऱ्या या संमेलनात विविध चर्चासत्रे आणि व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारच्या सत्रात उच्च शिक्षणातील संधी या विषयावर अध्यक्ष डॉक्टर हेमचंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेत चर्चासत्र होणार आहे.

सायंकालीन सत्रात प्राध्यापक रेखा सिंघल यांचे काजू आंबा फणस यांची उपयोगिता या विषयावर व्याख्यान होईल त्यानंतर मधु मंगेश कर्णिक यांच्या अध्यक्षतेखाली कविता वाचन होणार आहे
रविवार 19 जानेवारी रोजी उद्योगधंदे व भविष्यातील संधी या विषयावर चर्चासत्र होईल.
अखेरच्या दिवशी जयगड बंदर व कातळशिल्पे यांना भेट व अभ्यास आयोजित करण्यात आला आहे.

COMMENTS