अन् शहरातील डुकरे झाली उस्मानाबाद नगरपालिकेच्या मालकीची !

अन् शहरातील डुकरे झाली उस्मानाबाद नगरपालिकेच्या मालकीची !

उस्मानाबाद शहरात फिरस्ती डुकरे, जनावरे व मोकाट कुत्र्यांची समस्या उस्मानाबादकरांना काही नवी नाही. त्यामुळे नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत हा विषय वारंवार चर्चीला जातो. काही सदस्यांनी हा विषय मागील एका सभेत मांडला होता. त्यावर पालिकेने वर्तमानपत्रात जाहिरात देऊन डुकरांना घेऊन जावे अन्यथा पालिकेला यावर कारवाई करावी लागले. असे जाहिरातीच्या माध्यमातून सांगितले. तरीही डुकरांची समस्या सुटली नाही. अखेर सदस्यांनी बुधवारी (ता. 15) हा प्रश्न पुन्हा उपस्थित केला. त्यावर नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी डुकरांना शहरातून घालविण्यासाठी काही प्रक्रिया करावी लागते. जाहिरात दिली होती, त्याला काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आता डुकरांची मालकी आपली झाली आहे. डुकरे पालिकेच्या, आपल्या मालकीची झाली आहेत असं म्हणाले. नगराध्यक्षांचं हे वाक्य ऐकताच सभागृहात हास्यकल्लोळ सुरु झाला. डुकरांची मालकी पालिकेकडे आल्यानंतर आतातरी डुकरांची ही समस्या सुटावी अशीच शहरवासियांची अपेक्षा आहे.

COMMENTS