बीड जिल्ह्यातील चारा छावणीच्या देयकाचा प्रश्न आठवडाभरात मार्गी लागणार – पंकजा मुंडे

बीड जिल्ह्यातील चारा छावणीच्या देयकाचा प्रश्न आठवडाभरात मार्गी लागणार – पंकजा मुंडे

बीड – चारा छावण्यांची देयके अदा करण्यासाठी शासनाकडून आवश्यक असणाऱ्या निधीबाबत राज्य स्तरावर पाठपुरावा करून या आठवड्यात निधी प्राप्त करून घेण्याचा शब्द राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना तथा जिल्हयाच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी आज छावणी चालकांच्या शिष्टमंडळाला दिला. दरम्यान, येत्या आठवडाभरात हा प्रश्न मार्गी लागणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

चारा छावण्या संस्थांच्या शिष्टमंडळाने आज पालकमंत्री पंकजा मुंडे यांची भेट घेतली. शिष्टमंडळात प्रामुख्याने भाजपचे जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे, राजेंद्र मस्के, शिवसेना जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडे, सर्जेराव तांदळे,संतोष हंगे आदींचा समावेश होता. त्यात प्रामुख्याने चारा छावण्याची तपासणी होतांना शासनाच्या नियमावली प्रमाणेच तपासणी व्हावी, परंतु एवढ्या कठीण कालावधीत चारा छावणी चालवणाऱ्या चालकाला त्यात त्रास होणार नाही याची काळजी शासनाच्या यंत्रणानी घ्यावी तसेच चारा छावण्याची देयके तात्काळ वितरीत करण्याची मागणी शिष्टमंडळाने केली. चारा छावणीची देयके अदा करण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा सुरू असून लवकरच जिल्हा प्रशासनाला निधी उपलब्ध करून दिला जाईल. आठवडाभरात हा प्रश्न मार्गी लावू असा ठाम विश्वास त्यांनी यावेळी दिला.

सर्वांत अगोदर बांधावर अन् प्रशासनाची गतीने कार्यवाही
——————————-
सन २०१८ च्या खरीप हंगामात मराठवाड्यासह काही जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान झालेले
असल्याने, राज्यशासनाने दुष्काळसद्दश्य परिस्थिती घोषित केलेली आहे. पंकजा मुंडे यांनी स्वतः शेतात जाऊन पाहणी केली. जिल्हाधिकारी आणि पथकासह त्या डायरेक्ट कापसाच्या शेतात आणि उसाच्या फडावर पोचल्या होत्या त्यामुळे अकराही तालुक्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती व त्यासाठी उपाय योजना यात गतीने कार्यवाही झाली. राज्यात दुष्काळी परिस्थितीत त्या भागातील पशुधनासाठी आवश्यक असणारा चारा व पाणी या उपलब्धतेबाबतचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याबद्दल पालकमंत्री संवेदनशील व सतर्क होत्या. दुष्काळग्रस्त भागातील जनावरांना आवश्यक असलेल्या चाऱ्याच्या प्रश्नावर मात करण्यासाठी चारा छावण्या सुरू केल्या आहेत. या छावण्या जास्तीत जास्त शेतक-यांना व त्यांच्या पशूधनाला दिलासा देतील. छावणीची संख्या व निकष यावर वेळोवेळी कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत आग्रह धरून निर्णय घेण्यात पंकजा मुंडेंनी पुढाकार घेतला आहे.

COMMENTS