राज ठाकरेंना महाआघाडीत घेण्याबाबत शरद पवारांचं मोठ वक्तव्य !

राज ठाकरेंना महाआघाडीत घेण्याबाबत शरद पवारांचं मोठ वक्तव्य !

मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना महाआघाडीत सामावुन घेण्याबाबत राष्टेरवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठ वक्तव्य केलं आहे. राज ठाकरे यांना महाआघाडीत सामावून घेण्यासाठी आम्ही गांभीर्याने विचार करत असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
राज ठाकरेंना ज्या प्रकारे तरुण पीढीचा आणि नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे, तसाच प्रतिसाद बाळासाहेब ठाकरेंनाही मिळत होता. त्यामुळे बाळासाहेबांना निवडणुकीत लगेच पूर्ण बहुमत मिळालं नव्हतं. मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीला राज ठाकरेंना मिळत असलेल्या प्रतिसादाची नोंद नक्की घ्यावी लागणार आहे. राज ठाकरेंशी आमची याबाबत चर्चा झालेली नाही. मात्र राज ठाकरेंना आम्ही दुर्लक्ष करु शकत नाही, असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान भाजपसोबत युती करणार नसल्याची घोषणा उद्धव ठाकरेंनी पंढरपूरच्या सभेत केली होती. मात्र आपली भूमिक बदलत लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेनं भाजपसोबत युती केली. एवढ्या आरोप-प्रत्यारोपानंतर शिवसेना-भाजपच्या युतीमुळे शिवसेनेच्या पक्ष नेतृत्वाच्या प्रतिमेला मोठा तडा गेला असल्याचं शरद पवारांनी म्हटलं आहे. तसेच बाळासाहेब ठाकरे आपल्या भूमिकांवर ठाम राहायचे, ते आपला शब्द पाळायचे. बाळासाहेबांचं तेच प्रतिबिंब आज राज ठाकरेंमध्ये दिसत असल्याचंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.

COMMENTS