पालकमंत्री पंकजा मुंडेंच्या समर्थकांकडून काँग्रेस कार्यकर्त्यावर हल्ला ! VIDEO

पालकमंत्री पंकजा मुंडेंच्या समर्थकांकडून काँग्रेस कार्यकर्त्यावर हल्ला ! VIDEO

बीड – पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी काँग्रेस कार्यकर्त्यावर हल्ला केला आहे. या हल्ल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला असून भाजप उमेदवार डॉक्टर प्रीतम मुंडे यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेतल्यामुळे काँग्रेसचे कार्यकर्ते दादासाहेब मुंडे यांच्यावर हा हल्ला करण्यात आला आहे. आठ ते दहा कार्यकर्त्यांनी मुंडे यांना बेदम मारहाण केली आहे.

दरम्यान दादासाहेब मुंडे हे पूर्वी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचे निकटवर्तीय होते. सध्या ते काँग्रेस पक्षात असून त्यांनी आक्षेप घेतल्याने त्यांना मारहाण करण्यात आली आहे. याप्रकरणी अद्याप पोलिसात गुन्हा दाखल झालेला नाही.

COMMENTS