राहुल गांधींचं माणूसपण, अपघातग्रस्त पत्रकाराला मदतीचा हात! VIDEO

राहुल गांधींचं माणूसपण, अपघातग्रस्त पत्रकाराला मदतीचा हात! VIDEO

नवी दिल्ली – काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचं माणूसपण पुन्हा एकदा समोर आलं आहे. राहुल गांधी यांनी आज एका अपघातग्रस्त पत्रकाराला मदतीचा हात दिला आहे. राजेंद्र व्यास असं या पत्रकाराचं नाव असून हमायूं रोडवरुन जात असताना त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला. यामध्ये ते जखमी झाले होते. यादरम्यान राहुल गांधी याच रस्त्यावरुन जात होते. यावेळी व्यास पडलेले असल्याचं पाहून राहुल गांधी यांनी आपला ताफा थांबवला. व व्यास यांना आपल्या गाडीत घेऊन त्यांनी त्यांची चौकशी केली. एवढच नाही तर राहुल गांधी यांनी व्यास यांच्या डोक्याला लागलेली मारहाण पाहून त्यांच्या डोक्याचं रक्त देखील पुसलं. त्यांचा हा स्वभाव पाहून व्यास यांनी राहुल गांधी यांचे आभार मानले.

COMMENTS