…तर स्वतंत्र विदर्भाचे वचन देणा-या भाजपने मौन पाळले असते काय ?, शरद पवारांचा सवाल !

…तर स्वतंत्र विदर्भाचे वचन देणा-या भाजपने मौन पाळले असते काय ?, शरद पवारांचा सवाल !

नवी दिल्ली – स्वतंत्र विदर्भासाठी तेथील लोक खरोखर आग्रही असते तर मुख्यमंत्री फडणवीस अथवा जाहीरनाम्यात वचन देणा-या भाजपाने मौन पाळले असते काय, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. लोकमतला दिलेल्या प्रतिक्रियेत ते बोलत होते. तसेच विदर्भातल्या जनतेला स्वतंत्र विदर्भ राज्य हवे असेल तर माझा अथवा पक्षाचा त्याला विरोध नसून पूर्वीपासून माझी हीच भूमिका असल्याचही पवार यांनी म्हटलं आहे. तसेच पुण्यातील मुलाखतीत या भूमिकेचा मी पुनरुच्चार केल्याने विदर्भातले काही मित्र अस्वस्थ झाल्याचे वाचनात आले. त्यामुळे पुन्हा हा खुलासा करावा लागला असल्याचंही पवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान स्वतंत्र विदर्भासाठी परिस्थिती अनुकूल असून विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विदर्भातलेच आहेत. यापूर्वी विधानसभेत आणि बाहेरही फडणवीसांनी स्वतंत्र विदर्भाची मागणी अनेकदा केली आहे. तसेच भाजपाच्या जाहीरनाम्यातही स्वतंत्र विदर्भाचा स्पष्ट उल्लेख असून सध्या महाराष्ट्रात व केंद्रात भाजपाचे सरकार आहे. त्यामुळे स्वतंत्र विदर्भासाठी मुख्यमंत्री फडणवीस खरोखर आग्रही असते तर ते थांबले असते काय, असा सवालही पवार यांनी केला आहे.

COMMENTS