गुजरातमध्ये पुढील निवडणुकीत 135 जागा जिंकू – राहुल गांधी

गुजरातमध्ये पुढील निवडणुकीत 135 जागा जिंकू – राहुल गांधी

अहमदाबाद – निवडणुकीनंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी शनिवारी पहिल्यांदाच गुजरातचा दौरा केला आहे. या दौ-यात त्यांनी भाजपला चांगलीच टक्कर दिल्याबद्दल गुजरातमधील काँग्रेस कार्यकर्त्यांचं कौतुक केलं आहे. तसेच पुढच्या निवडणुकीत काँग्रेसच गुजरातमध्ये सत्ता स्थापन करणार असून काँग्रेसला 135 जागा मिळतील असा विश्वास राहुल गांधी यांनी व्यक्त केला आहे.

गुजरातमध्ये 90 टक्के लोकांनी एकत्रितपणे पक्षाच्या विजयासाठी प्रयत्न केले आहे. परंतु 5 ते 10 टक्के लोकांनी सहकार्य केले नाही. त्यामुळे पक्ष त्यांच्यावर निश्चित कारवाई करणार असल्याचंही त्यावेळी राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. तसेच या निवडणुकीत सत्ता मिळाली नसली तरी आपण जिंकलो आहोत. त्यामुळे खचून न जाता पुढच्या निवडणुकीच्या तयारीला लागा, असंही राहुल गांधी यांनी त्यावेळी कार्यकर्त्यांना म्हटलं आहे. तसेच राहुल गांधी यांनी भाजपचं विजयाबद्दल कौतुक केलं असून पुढील पाच वर्षे काँग्रेस सक्षम विरोधी पक्षाची भूमिका बजावणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

COMMENTS