आमदाराचा मुलगा शिपाई म्हणून सरकारी नोकरीत रुजू !

आमदाराचा मुलगा शिपाई म्हणून सरकारी नोकरीत रुजू !

जयपूर: आपण अनेकवेळा पाहिलं असेल की एखाद्या राजकीय नेत्याचा मुलगा हा राजकारणात जातो, किंवा तो मोठा डॉक्टर, इंजिनिअर बनतो, परंतु राजस्थानमधील एका भाजप आमदाराचा मुलगा वेगळ्याच पोस्टवर रुजू होणार आहे. भाजपचे आमदार जगदीश नारायण मीणा यांचा मुलगा लवकरच विधानसभेत शिपाई पदावर रुजू होणार आहे.

राजस्थानमधील जामवा-रामगढचे आमदार जगदीश नारायण मीणा यांचा मुलगा रामकिशनची १८,००८ उमेदवारांमधून शिपाई पदासाठी निवड करण्यात आली आहे. निवड समितीने मुलाखत घेऊन रामकिशनची निवड केली आहे. रामकीशनची निवड केल्यामुळे विरोधकांनी मीणा यांच्यावर ‘घराणेशाही’चा आरोप केला आहे. तसेच या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. ‘भाजप सरकारने तरुणांना १५ लाख नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिलं आहे. परंतु त्यातील काही हजार नोकऱ्या सत्ताधारी पक्षाचे नेते कुटुंबीय आणि नातेवाईकांना दिल्या जात आहेत. त्यामुळे इतर तरुणांनी काय करायचं असा प्रश्न काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट यांनी केला आहे.

COMMENTS