कृष्णकुंजभोवती कोरोनाचा विळखा, राज ठाकरे यांच्या एकूण 7 कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग !

कृष्णकुंजभोवती कोरोनाचा विळखा, राज ठाकरे यांच्या एकूण 7 कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग !

मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या कृष्णकुंजभोवती कोरोनाचा विळखा वाढत असल्याचं दिसत आहे. कारण
आणखी एका चालकाला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्या एकूण 7 कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. सर्वात आधी राज ठाकरे यांच्या घराबाहेर सुरक्षेसाठी तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकांपैकी 3 सुरक्षा रक्षकांना कोरोनाची लागण झाली होती. यानंतर घरकाम करणारा सेवक आणि दोन चालकांनाही कोरोनाची लागण झाली होती. आता पुन्हा एकदा आणखी एका चालकाचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आल्याने खळबळ उडाली आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वी राज ठाकरेंच्या काही शासकीय सुरक्षा रक्षकांना कोरोनाची लागण झाली होती. सुदैवाने त्यांनी ‘कोरोना’वर यशस्वी मातही केली त्यानंतर 2 वाहनचालकांना ‘कोरोना’ची लागण झाली. आता पुन्हा एका चालकाला संसर्ग झाल्याने एकूण 3 वाहन चालकांना कोरोना संसर्ग झाला आहे. वाहन चालकांवर सध्या मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

COMMENTS