अमेरिकेत जाऊन किडनीवर उपचार करण्यासाठी राजीव गांधींनी केली होती वाजपेयींना मदत !

अमेरिकेत जाऊन किडनीवर उपचार करण्यासाठी राजीव गांधींनी केली होती वाजपेयींना मदत !

नवी दिल्ली – माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी हे १९८७ मध्ये किडनीच्या आजाराने ते त्रस्त होते. तेव्हा त्यांच्याकडे अमेरिकेत जाऊन उपचार करण्या इतपत पैसे नव्हते. त्यावेळी तेव्हाचे पंतप्रधान राजीव गांधी यांनी तेव्हा वाजपेयी यांना मदत केली होती. राजीव गांधी यांनी केलेल्या मदतीमुळे त्यांनी अमेरिकेत जाऊन किडनीवर उपचार घेतले होते.याबाबत राजीव गांधींनी केलेली मदत वाजपेयी विसरले नव्हते. अनेकवेळा त्यांनी सार्वजनिक सभांमध्ये राजीव गांधी यांचे आभारही मानले होते.

दरम्यान वाजपेयी यांचं वयाच्या 93 व्या वर्षी काल दिल्लीतील एम्स रुग्णालयात निधन झालं. ते ११ जूनपासून रुग्णालयात दाखल होते. त्यांना मधुमेहाने ग्रासले होते आणि त्यांचे एकच मूत्रपिंड कार्यरत होते. गेले नऊ आठवडे त्यांच्यावर ‘एम्स’मध्ये उपचार सुरू होते. गेल्या ३६ तासांत त्यांची प्रकृती झपाट्याने खालावली होती. त्यामुळे त्यांचं अखेर काल निधन झाले.

 

 

 

 

COMMENTS