लोकसभा निवडणुकीनंतर भाजपची काय स्थिती असणार ?, शरद पवार यांचं भाकीत!

लोकसभा निवडणुकीनंतर भाजपची काय स्थिती असणार ?, शरद पवार यांचं भाकीत!

अलिबाग  – लोकसभा निवडणुकीनंतर भाजपची काय स्थिती असणार याबाबत राष्ट्वादीचे अध्यक्ष रशरद पवार यांनी भाकीत वर्तवलं आहे. लोकसभा निवडणुकीनंतर भाजपाला पूर्ण बहुमत मिळेल असे वाटत नाही, देशातील प्रादेशिक राजकीय परिस्थिती लक्षात घेतली तर भाजपसाठी २०१४ सारखी परिस्थिती राहणार नसल्याचं पवारांनी म्हटलं आहे. ते अलिबाग येथील शेतकरी भवनात बोलत होते.

दरम्यान गेल्या पाच वर्षांत प्रादेशिक पातळीवरील राजकीय परिस्थिती बदलली आहे. उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टी एकत्र आले आहेत. चंद्राबाबू नायडू एनडीएच्या सोबत नाहीत. जयललिता यांच्या पश्चात तामिळनाडूमध्ये एडीएमकेमध्ये गटातटाचे राजकारण सुरू आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगढमध्ये विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव झाला आहे. कर्नाटकमधील परिस्थिती भाजपसाठी आश्वासक नाही. त्यामुळे लोकसभा निवडणुकीनंतर भाजपला पूर्ण बहुमत मिळेल असे वाटत नसल्याचं पवारांनी म्हटलं आहे.

COMMENTS