मंत्री रामदास कदम यांच्या अडचणीत वाढ!

मंत्री रामदास कदम यांच्या अडचणीत वाढ!

मुंबई –  पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्या अडचणीत वाढ झाली असल्याचं दिसत आहे. कारण रामदास कदम यांच्या शिवतेज या आरोग्य संस्थेविरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. रामदास कदम अध्यक्ष असलेल्या ‘शिवतेज’ या आरोग्य संस्थेने गैरप्रकार करत राखीव भूखंड मिळवला आणि त्यावर बेकायदा बांधकाम केले असल्याचा आरोप  या याचिकेत करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण?

खेड नगर परिषदेच्या हद्दीत सर्व्हे क्रमांक १४९०वर सुमारे एक हजार ६०० चौ. मीटरचा भूखंड आहे. हा हरित पट्ट्यासाठी राखीव भूखंड आहे. मात्र, असे असतानाही नगर परिषदेने ठराव करून शिवतेज संस्थेला निवासी प्रयोजनासाठी हा भूखंड देण्यात आला आहे. वर्षाला शंभर रुपये अशा कवडीमोल भावात ९९ वर्षांच्या कराराने हा भूखंड देण्यात आला. या भूखंडावर कोणतेही आरक्षण नसल्याची खोटी व चुकीची माहिती नगरपरिषदेने राज्य सरकारच्या नगरविकास विभागाला दिली आणि त्यानंतर सरकारने त्याविषयी जीआर काढला. नंतर भूखंडाचे आरक्षण रद्द करून या भूखंडावर फिटनेस सेंटर बांधण्यास परवानगी द्यावी, अशी विनंती संस्थेचे अध्यक्ष रामदास कदम यांनी नगरविकास सचिवांना केली असल्याचा आरोप या याचिकेत करण्यात आला आहे.

COMMENTS