विधानसभा निवडणुकीत मनसेची भूमिका, शरद पवारांचं मोठ वक्तव्य !

विधानसभा निवडणुकीत मनसेची भूमिका, शरद पवारांचं मोठ वक्तव्य !

कोल्हापूर – आगामी विधानसभा निव़णुकीत मनसेची भूमिका काय असणार याबाबतचं भाष्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांचा एककलमी कार्यक्रम आहे. मोदी-शहा जोडी देशाला घातक आहे, हे त्यांना सांगायचं आहे. त्यांनी ही निवडणूक लढवली नाही. मात्र विधानसभा निवडणुकीत त्यांचे उमेदवार असतील. चुकीच्या लोकांच्या हातून राज्य काढून घेण्यासाठी उद्याच्या काळात चर्चा होऊ शकते,’ असं वक्तव्य पवार यांनी केलं आहे. ते कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलत होते.

दरम्यान यावेळी पवार यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. राफेलची संसदेत माहिती दिली जात नाही, मात्र वृत्तपत्रात ती छापून येते. वृत्तपत्रांच्या स्वातंत्र्यावर पण गदा आणली जात आहे. मोदी फसगत करत आहेत. त्यांनी काहीच केलं नाही, म्हणून दुसरा विषय काढून लक्ष वळवलं जात असल्याचं पवारांनी म्हटलं आहे.

COMMENTS