मनसेचे एकमेव आमदार शरद सोनवणे शिवसेनेत, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत प्रवेश!

मनसेचे एकमेव आमदार शरद सोनवणे शिवसेनेत, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत प्रवेश!

मुंबई – जुन्नर येथील मनसेचे एकमेव आमदार असलेले शरद सोनवणे यांनी आज शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. मुंबईतील शिवसेना भवनात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठातयकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवबंधन भांधले. आज शरद सोनवणे आणि इतर कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी आपलं लोकसभा जिंकलीच आहे, आता विधानसभा जिंकायची आहे असा विश्वासही व्यक्त केला.

दरम्यान सर्व वाघांचं शिवसेनेत स्वागत. शिवसेनेत फक्तं वाघच राहू शकतात. जो शिवसेनेचा आहे तो सेनेत परत आला आहे’ असं म्हणत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनसेचे एकमेव आमदार शरद सोनवणे यांचं पक्षात स्वागत केलं आहे. तसंच जुन्नरमध्ये जाहीर सभा घेणार, असल्याचंही उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे.

COMMENTS