सुजय विखे भाजपात नाही तर राष्ट्रवादीत प्रवेश करणार,  काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची फोनवर चर्चा !

सुजय विखे भाजपात नाही तर राष्ट्रवादीत प्रवेश करणार, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची फोनवर चर्चा !

मुंबई – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे हे भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. परंतु सुजय विखे यांचा भाजप प्रवेश थांबवून त्यांना राष्ट्रवादीत प्रवेश दिला जाणार असल्याचं बोललं जात आहे. याबाबत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी फोनवर चर्चा केली आहे.

दरम्यान सुजय विखे यांनी नगर लोकसभा निवडणूक राष्ट्रवादीच्या तिकीटावर लढवण्याचा प्रस्ताव
काँग्रेस नेत्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांपुढे ठेवला आहे. याबाबत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी फोनवर चर्चा केली आहे. तसेच राष्ट्रवादीलाही हा प्रस्ताव मान्य असून
आज रात्री शरद पवारांबरोबर चर्चा केली जाणार असून या बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे.

COMMENTS