काँग्रेसचे नेते शशी थरूर ट्वीटरवर ट्रोल !

काँग्रेसचे नेते शशी थरूर ट्वीटरवर ट्रोल !

नवी दिल्ली – चुकीचा फोटो टाकल्यामुळे काँग्रेसचे नेते शशी थरूर यांना ट्वीटरवर ट्रोल व्हावे लागलं आहे. महावीर जयंतीच्या शुभेच्छा देताना शशी थरुर यांनी चुकीचा फोटो शेअर केला आहे. थरूर यांनी भगवान महावीर यांच्या फोटोऐवजी चुकून तथागत गौतम बुद्धांचा फोटो ट्विटरवर शेअर केला होता. त्यामुळे त्यांना ट्रोलर्सचा सामना करावा लागला असल्याचं पहावयास मिळालं आहे.

 

 

दरम्यान शशी थरूर यांना यापूर्वीही ट्रोल व्हावं लागलं आहे. एकदा हिंदीत ट्विट केल्यानंतर बऱ्याच युजर्सनी त्यांना फैलावर घेतले होते. परंतु यावेळेस मात्र थरुर यांनी मोठी चूक केली असून ट्विटर अकाउंटवर त्यांनी हॅप्पी महावीर जयंती असं ट्विट करत ट्विटसोबतच भगवान महावीर यांच्या फोटोऐवजी चुकून तथागत गौतम बुद्धांचा फोटो शेअर केला आहे. त्यामुळे त्यांना ट्रोल व्हावं लागलं आहे.

COMMENTS