“छे छे, चर्चा असली तरी मी उस्मानाबादमधून लोकसभा लढवणार नाही”

“छे छे, चर्चा असली तरी मी उस्मानाबादमधून लोकसभा लढवणार नाही”

प्रशांत आवटे, बार्शी

बार्शी – लोकसभा निवडणुकीसाठी आता केवळ एक वर्षाचा अवधी शिल्लक आहे. त्यामुळे विविध पक्षात निवडणुकीची चाचपणी सुरू आहे. इच्छुक आपली मोर्चेबांधणी करत आहेत. तर विविध राजकीय पक्ष कोणता उमेदवार पक्षाला विजय मिळवून देऊ शकतो त्या दृष्टीने उमेदवारांची चापपणी करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही विविध नावांची चर्चा आहे. माजी खासदार डॉ. पद्मसिंह पाटील हे प्रकृतीमुळे आगामी लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत अशीच शक्यता आहे. त्यामुळे पर्यायी उमेदवार कोण याची पक्षात चाचपणी सुरू आहे.

जिल्हा परिषदेच्या विद्यमान उपाध्यक्ष अर्चना पाटील यांचं नाव प्रामुख्याने चर्चिले जात आहे. अर्चना पाटील या आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी आहेत. पाटील कुटुंबियांचा जिल्ह्यात असलेला दबदबा पाहता त्यांनाच तिकीट मिळेल अशी शक्यता आहे. मात्र घराणेशाही आणि काँग्रेस पक्षाशी असलेले त्यांचे कटू संबंध यामुळे पर्यायी उमेदवार म्हणून बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांचं नाव चर्चेत आहे. जिल्ह्यात असलेले सामाजिक गणित आणि त्यांचे काँग्रेससह सर्वपक्षीय असेलेल संबंध पाहता सोपल यांचंही नाव उस्मानाबादमधू चर्चेत आहे.

बार्शीमध्ये आज आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये सोपल यांना लोकसभा उमेदवारीबाबत छेडले असता आपण उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार नाही अंसं स्पष्ट केलं.  “छे छे आपण लोकसभेसाठी इच्छुक नाही ,उलट ज्यांची नावं चर्चेत असतात त्यांना तिकीट दिल जात नाही” अस मार्मिक उत्तर दिलं. सोपल यांची इच्छा नाही त्यामुळे त्यांनी नकार कळवून टाकला. ते बार्शीमधून विधानसभेसाठी इच्छुक आहेत. आता त्यांची इच्छा नसली आणि पक्षाने त्यांना उमेदवारीसाठी आग्रह धरला तर ते काय करतात ते पहावं लागेल.

COMMENTS