शिवाजी पार्कात मंडप कोसळल्यानं खळबळ

शिवाजी पार्कात मंडप कोसळल्यानं खळबळ

दुर्घटनेत तीन आंबेडकरी अनुयायी जखमी

मुंबई – शिवाजी पार्क येथे महापालिकेने उभारलेला मंडप कोसळल्याची घटना घडली आहे. दुर्घटनेत तीन आंबेडकरी अनुयायी जखमी झाले आहेत. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६१ व्या महापरिनिर्वाण दिनासाठी राज्यभरातून आंबेडकरी अनुयायी मुंबईत दाखल झाले आहेत.या अनुयायांसाठी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हा मंडप उभारण्यात आला आहे.परंतु जोरदार पाऊस आणि वादळामुळे हा मंडप कोसळला आहे.

या दुर्घटनेत यमुनाबाई खंदारे, महादेव खंदारे, निलेश भंडारी हे अनुयायी जखमी झालेत. जखमींना सायन रुग्णालयात दाखल केलं आहे. तिघांचीही प्रकृती स्थिर आहे. मंडप कोसळल्याने शॉर्ट सर्किट होऊन नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. त्यावेळी संतप्त अनुयायांनी महापालिका, महापौर आणि मुख्यमंत्र्यांविरोधात घोषणाबाजी केली.

दरम्यान, अनुयायांनी शिवाजी पार्क मैदानाऐवजी महापालिकांच्या शाळांमध्ये थांबावं असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. दादर आणि जवळच्या परिसरातील एकूण ७० पालिका शाळांमध्ये आंबेडकरी अनुयायांच्या राहण्याची सोय करण्यात आली आहे.

COMMENTS