मंत्रालयात भरणार सरपंच दरबार, कारभा-यांनो प्रत्येक महिन्याच्या पहिल्या गुरूवारी मांडा मंत्रालयात गावच्या समस्या !

मंत्रालयात भरणार सरपंच दरबार, कारभा-यांनो प्रत्येक महिन्याच्या पहिल्या गुरूवारी मांडा मंत्रालयात गावच्या समस्या !

मुंबई – राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या गुरूवारी मंत्रालयात सरपंच दरबार घेण्याचा अनोखा उपक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या दरबारात त्या ग्रामीण भागातील समस्या सरपंचांकडून जाणून घेणार आहेत. येत्या गुरूवारी मंत्रालयातील दालनात त्या पहिला दरबार घेणार आहेत.

ग्रामीण महाराष्ट्राचा सर्वांगिण विकास करण्यासाठी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी प्रत्येक  महिन्यातील एक दिवस हा पुर्णपणे सरंपचांसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सरपंच हा ग्रामविकासाचा पाया मजबूत करणारा महत्त्वाचा घटक असल्याने त्यांच्याकडून गावच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी यातून प्रयत्न केले जाणार आहेत. त्यासाठी दर महिन्याचा पहिला गुरुवार राखीव ठेवण्यात आला आहे. त्यादिवशी सुट्टी असल्यास दुसर्‍या दिवशी म्हणजे शुक्रवारी राज्यातील सरपंचांना त्या भेटणार आहेत.

पहिला सरपंच दरबार या महिन्याच्या पहिल्या गुरूवारी म्हणजे येत्या ०७ डिसेंबर रोजी सकाळी ११.३० वा. मंत्रालयातील चौथ्या मजल्यावरील दालनात होणार आहे. यावेळी राज्यातील सरपंचांना गावातील अडचणी व मागण्या थेट ग्रामविकास मंत्र्यांकडे सादर करता येणार असल्याने सरपंचांनी भेटीसाठी येताना आपापल्या गावातील प्रश्नांचे निवेदन सोबत आणावे, असे आवाहन ग्रामविकास मंत्री कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

COMMENTS