युतीसाठी शिवसेनेचा भाजपकडे नवा प्रस्ताव !

युतीसाठी शिवसेनेचा भाजपकडे नवा प्रस्ताव !

मुंबई – आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आली आहे. परंतु शिवसेना भाजप युतीचं भिजत घोंगडं तसच आहे. युती होणार की नाही याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. युतीसाठी शिवसेनेनं भाजपपुढे नवा प्रस्ताव मांडला असल्याची माहिती आहे. लोकसभेसाठी जर युती करायची असेल तर राज्यात आमचा मुख्यमंत्री असायला हवा, असा प्रस्ताव शिवसेनेनं भाजपपुढे मांडला आहे.

दरम्यान जर २०१९ मध्ये एनडीएचे सरकार स्थापन झाले तर त्यामध्ये शिवसेना, अकाली दल आणि इतर महत्वाच्या मित्र पक्षांची महत्वाची भुमिका असेल. एनडीएतील हे सर्व मित्रपक्ष त्यांच्या राज्यांमध्ये मजबूत आहेत. त्यामुळे जर तुम्हाला केंद्रात युती हवी असेल तर त्या मित्र पक्षांचा मुख्यमंत्री त्यांच्या राज्यात असायला हवा अशी मागणी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केली आहे. त्यामुळे आता राऊत यांच्या प्रस्तावाला भाजप काय उत्तर देणार याकडे लक्ष लागलं आहे.

 

COMMENTS