यांच्याशिवाय दुसरे कोणते बेस्ट कपल असू शकते का? –  धनंजय मुंडे

यांच्याशिवाय दुसरे कोणते बेस्ट कपल असू शकते का? – धनंजय मुंडे

मुंबई –  विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी व्हॅलेंटाइन डे च्या निमित्ताने शिवसेना-भाजपवर टीका केली आहे. मुंडे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांचा  फोटो ट्विट करत यांच्याशिवाय दुसरे कोणते बेस्ट कपल असू शकते का? असा टोला मारला आहे.ट्विटमध्ये त्यांनी व्हॅलेंटाइन डेचा हॅशटॅगही दिला आहे.

धनंजय मुंडे यांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे की, ‘यांच्याशिवाय दुसरे कोणते बेस्ट कपल असू शकते का? गेली पाच वर्षे रोज कितीही भांडले तरी पुन्हा एकत्रच… केवढा तो एकमेकांवर जीव… नाही का?’ असा टोला मुॆडे यांनू लगावला आहे.

COMMENTS