शिवसेनेला भाजपकडून कोणतीही ऑफर नाही, या सगळ्या थापा –शिवसेना खासदार

शिवसेनेला भाजपकडून कोणतीही ऑफर नाही, या सगळ्या थापा –शिवसेना खासदार

मुंबई – आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेला 150 जगांची ऑफर भाजपनं दिली असल्याची चर्चा होती. परंतु या सर्व थापा असून भाजपनं अशाप्रकारची कोणतीही ऑफर दिली नसल्याचं वक्तव्य शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी केलं आहे. आगामी निवडणुकीत शिवसेनेनं स्वतंत्र निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. त्यानंतर भाजपनं एकत्र निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव शिवसेनेसमोर ठेवला असल्याची चर्चा होती परंतु ही चर्चा खोटी असून भाजपचा असा कुठला प्रस्ताव आला नसल्याचं आढळराव पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान देशात आणि केंद्रात कधीही निवडणुका लागू शकतात त्यामुळे या परिस्थितीत काम कसे करायचे याबाबत उद्धव ठाकरे यांनी आज मार्गदर्शन केलं असल्याचंही आढळराव पाटील यांनी म्हटलं आहे. तसेच यासाठी मतदार याद्या अद्ययावत करणे आणि गावात संपर्क अभियान सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून सरकारच्या कोणकोणत्या योजना गावात पोहचल्या आहेत याबाबत माहिती घेण्यास उद्धव ठाकरे यांनी सांगितलं असल्याचंही आढळराव पाटलांनी म्हटलं आहे.

COMMENTS