राहुल गांधींसह काँग्रेसचे नेते चहाच्या टपरीवर !

राहुल गांधींसह काँग्रेसचे नेते चहाच्या टपरीवर !

बंगळुरू आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी सध्या कर्नाटकच्या दौ-यावर आहेत. या दौ-यादरम्यान राहुल गांधींचा साधेपणा पहावयास मिळाला आहे. रायचूर जिल्ह्यातील कलमाला या गावातील एका छोट्याशा टपरीवर राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी चहा आणि गरमागरम भजीवर ताव मारला आहे. त्यामुळे राहुल गांधींच्या या साधेपणाची सध्या राज्यभरात जोरदार चर्चा सुरु आहे. एवढच नाही तर राहुल गांनी या चहाच्या टपरीवाल्यासोबत सेल्फीही काढला असून गावातील इतर गरीब नागरिकांशी त्यांनी चर्चाही केली असल्याची माहिती आहे.

 https://twitter.com/MahilaCongress/status/962949004123353088

दरम्यान या प्रचारसभांदरम्यान राहुल गांधी यांचं देवदर्शनही जोरात सुरु आहे. राज्यातील महत्त्वाच्या आणि प्रसुद्ध मंदिरांना राहुल गांधी भेट देत आहेत. आजच्या प्रचाराची सुरुवातही त्यांनी रायचूर जिल्ह्यापासून केली. त्यावेळी त्यांनी तेथील दर्ग्याला पहिल्यांदाच भेट दिली आहे. त्यावेळी त्यांनी दर्ग्यावर चादर चढवत प्रार्थना केली. या वेळी त्यांच्यासोबत कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमय्या आणि काँग्रेसचे इतर ज्येष्ठ नेते उपस्थित होते.

 

COMMENTS