सोनिया गांधींचा शरद पवारांना फोन, म्हणाल्या…

सोनिया गांधींचा शरद पवारांना फोन, म्हणाल्या…

नवी दिल्ली –  काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना फोन केला. सोनिया गांधी यांनी शरद पवारांना फोन करून दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आणि निवडणुकीतल्या निकालांबद्दल आभारही मानले. पवारांनी जी मेहनत घेतली आणि रणनीती आखली त्याचा काँग्रेसलाही फायदा झाला अशा भावना सोनियांनी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळालं आहे. परंतु या निवडणुकी काँग्रेस राष्ट्रवादीलाही मोठं यश मिळालं आहे. याचं श्रेय शरद पवार यांना जातं.वयाच्या 80 व्या वर्षी शरद पवार यांनी निवडणुकीत बाजी पलटवून लावली. तसेच काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीने सरस कामगिरी करत परिस्थिती बदलविण्याची ताकद कायम असल्याचं शरद पवारांनी दाखवून दिलं. यामुळेच काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पवारांना खास फोन करून त्यांचे आभारही मानले आणि आपल्या भावनाही व्यक्त केल्या.

COMMENTS