“मॅग्नेटिक महाराष्ट्राच्या पानभर जाहिराती, शिवजयंतीची एक तरी जाहिरात छापली का ?”

“मॅग्नेटिक महाराष्ट्राच्या पानभर जाहिराती, शिवजयंतीची एक तरी जाहिरात छापली का ?”

जळगाव – मॅग्नेटिक महाराष्ट्राच्या स्वतःच्या फोटोसह पानभर जाहिराती देणाऱ्या सरकारने शिवजयंतीची एखादी तरी शुभेच्छा देणारी जाहिरात छापली का? असा सवाल विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. सरकारकडून स्वतःच्या कार्यक्रमाच्या जाहिरातींचा भडीमार केला जात आहे. कोट्यवधी रुपये जाहिरातींवर खर्च केले जात असल्याचंही मुंडे यांनी रावेर येथील हल्लाबोल यात्रेच्या सभेत बोलत होते. त्यामुळे या सर्वांचं उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेला द्यावे असंही मुंडे यांनी त्यावेळी म्हटलं आहे.

 

https://twitter.com/dhananjay_munde/status/965859735772606464

 

दरम्यान मॅग्नेटीक महाराष्ट्राचा मोठा इव्हेंट मुंबईत पार पडला. त्या इव्हेंटच्या प्रत्येक वृत्तपत्राला मोठ्या जाहिराती सरकारने दिल्या. मात्र छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीची एकही जाहिरात सरकारने दिली नाही. मी मुख्यमंत्र्यांना सवाल विचारू इच्छितो की ज्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा आशिर्वाद घेऊन हे सरकार आले त्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त यांनी जाहिराती का दिल्या नाहीत. तसेच काल संपूर्ण विश्वभरात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी केली गेली मात्र संघाच्या एकाही शाखेत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी केली गेली नसल्याचा सनसनाटी आरोपही त्यांनी केला.

माझा शेतकरी चोर आहे का ?

तसेच मराठवाड्यातील गारपीटग्रस्त भागात अत्यंत वाईट पद्धतीने पंचनामे होत असल्याचंही मुंडे यांनी म्हटलं आहे. शेतकऱ्यांच्या गळ्यात पाटी लटकवली जाते, त्या पाटीवर शेतकऱ्याबाबत माहिती लिहिलेली असते. हा शेतकऱ्यांचा अपमान आहे. माझा शेतकरी चोर आहे का ? असा संतप्त सवाल राज्याच्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारला केला. तसेच यावेळी सौ. सुप्रियाताई सुळे, दिलीप वळसे पाटील, गफार मलिक यांची भाषणे झाली. व्यासपीठावर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, जयंत पाटील, भास्कर जाधव, माजी आमदार अरुण पाटील, सौ चित्राताई वाघ उपस्थित होते.

 

COMMENTS