भाजपचा आणखी एक घटकपक्ष सरकारविरोधात दंड थोपटण्याच्या तयारीत !

भाजपचा आणखी एक घटकपक्ष सरकारविरोधात दंड थोपटण्याच्या तयारीत !

मुंबई – एनडीएमध्ये सहभागी असलेले अनेक पक्ष सध्या सरकारविरोधात दंड थोपटत आहेत. विविध मुद्द्यांवर नाराज होत या पक्षांकडून सरकारविरोधात दंड थोपटले जात आहेत. काही दिवसांपूर्वीच खासदार राजू शेट्टी यांनी बाहेर पडत शेतकरी नेत्यांना एकत्र केलं असल्याचं दिसून आलं आहे. आता त्यानंतर शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सरकारविरोधात दंड थोपटणार आहेत. याबाबत त्यांनी सरकारला इशारा दिला असून देशभरात आरक्षणाच्या मुद्द्यावर ज्यांनी आंदोलन केलं त्यांना एकत्र करून लढा अधिक तीव्र करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच याबाबत 25 फेब्रुवारीला दिFल्लीत बैठक घेऊन सर्व समाजातील नेत्यांना एकत्र करणार असल्याचं मेटे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान महराष्ट्रात मराठा, धनगर समाजाचे नेते तर देशातील जाट, पाटीदार, गुरजरसह अनेक नेत्यांना एकत्र करणार असल्याचं विनायक मेटे यांनी म्हटलं आहे.यावरुन शेतकऱ्यांच्या मुद्दयावर खासदार राजू शेट्टींनी एनडीएमधून बाहेर पडत शेतकरी नेत्यांना एकत्र केलं तर आरक्षणाच्या मुद्द्यावर देशभरातील नेत्यांना एकत्र करण्याचा विनायक मेटे यांचा प्रयत्न असल्याचं दिसून येत आहे.

तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाबद्दलही मेटे यांनी सरकारवर टीका केली आहे. आतापर्यंत स्मारकाचं काम मार्गी लागणं अपेक्षित होतं मात्र तस झालं नसून मंत्रालयातील अधिकारी याला अडथळा आणत असल्याचा आरोप मेटे यांनी केला आहे. याबाबतमी मुख्यमंत्र्यांना ही सांगितलं होतं तसेच यामध्ये अधिकारी घोळ घालत आहेत. तसेच अधिकाऱ्यांनी चुकीचे सल्ले दिले आहेत त्यामुळे मी दोन दिवसात मुख्यमंत्र्यांना भेटून ठोस भूमिका घेण्याचं सांगणार असल्याचंही मेटे यांनी म्हटलं आहे. तसेच माझ्या समितीला कोणताही राज्यमंत्रीपदाचा अधिकार नसल्याची खंतही मेटे यांनी यावेळी व्यक्त केली आहे.

COMMENTS