राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना नववर्षाची भेट, सातव्या वेतन आयोगाला मंत्रिमंडळाची मंजुरी !

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना नववर्षाची भेट, सातव्या वेतन आयोगाला मंत्रिमंडळाची मंजुरी !

मुंबई – राज्य सरकारनं कर्मचाय्रांना खूशखबर दिली असून 1 जानेवारीपासून सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीला सुरुवात होणार आहे. आज घेण्यात आलेल्या बैठकीत राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे येत्या 1 जानेवारीपासून
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना नववर्षाची भेट मिळणार आहे.

दरम्यान के.पी. बक्षी समितीच्या अहवालावर मंत्रिमंडळाने आज शिक्कामोर्तब केलं आहे. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात महिना 5 हजारापासून ते 14 हजारापर्यंत वाढ होणार आहे.फेब्रुवारी महिन्यापासून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना ही नवीन वेतनवाढ लागू होणार आहे. सातव्या वेतन आयोगाचा 17 लाख सरकारी कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार आहे. यामुळे राज्याच्या तिजोरीवर 21 हजार कोटींचा बोजा पडणार आहे.

COMMENTS