आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय !

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय !

मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.

1) राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांसाठी 1 जानेवारी 2016 पासून सातवा वेतन आयोग लागू करण्यास मान्यता. प्रत्यक्ष लाभ 1 जानेवारी 2019 पासून देण्यासह तीन वर्षांची थकबाकी 2019-20 पासून 5 वर्षात 5 समान हप्त्यांत रोखीने देण्याचा निर्णय.

2) मुंबई मेट्रो मार्ग 4 अ कासारवडवली ते गायमुख या मेट्रो रेल्वे प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यास मंजुरी.

3) शंकररावजी चव्हाण विष्णुपुरी प्रकल्पामध्ये समाविष्ट असणाऱ्या नांदेड शहरानजीकच्या किवळा साठवण तलावाचे काम जलसंपदा विभागामार्फत करण्यास मान्यता.

COMMENTS