मंत्रिमंडळ विस्ताराबाबत सुधीर मुनगंटीवार यांनी दिले संकेत !

मंत्रिमंडळ विस्ताराबाबत सुधीर मुनगंटीवार यांनी दिले संकेत !

मुंबई – महामंडळाच्या नियुक्त्यांच्या जसा मुहूर्त आला तसा मंत्रीमंडळ विस्ताराचाही मुहुर्त योग्य वेळी येईल असं वक्तव्य भाजपचे नेते आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलं आहे. त्यामुळे मुनगंटीवार यांनी पुन्हा एकदा मंत्रिमडळ विस्तार होणार असल्याचे संकेत दिले आहेत.

दरम्यान राज्यात सध्या पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडत आहेत. याबाबातही मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सध्या  जागतिक स्तरावर कच्चा तेलाच्या किंमती जशा वाढतील तशा पेट्रोल – डिझेलच्या किंमत वाढतील. पेट्रोलच्या किंमतीत महाराष्ट्र देशात पहिला, तर डिझेलच्या किंमतीत आठव्या क्रमांकावर असून पेट्रोल – डिझेल जीएसटीमध्ये आणावे अशी राज्य सरकारची भूमिका आहे, तसा प्रयत्न आम्ही जीएसटी कौन्सिलमध्ये करणार आहोत. तसेच दर जास्त आहेत ही वस्तुस्थिती असल्याचंही मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.

COMMENTS