मराठा समाजाकडून महाराष्ट्र बंद तूर्त स्थगित, सुरेशदादा पाटील यांनी दिली महत्त्वाची माहिती ! पाहा

मराठा समाजाकडून महाराष्ट्र बंद तूर्त स्थगित, सुरेशदादा पाटील यांनी दिली महत्त्वाची माहिती ! पाहा

मुंबई – मराठा आरक्षण समन्वय समितीकडून 10 ऑक्टोंबर रोजी महाराष्ट्र बंद करण्याची घोषणा केली होती. परंतु हा बंद आता मागे घेण्यात आला आहे. याबाबतची माहिती मराठा समाजाचे नेते सुरेशदादा पाटील यांनी दिली आहे.
काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत मराठा आरक्षण समन्वय समितीची बैठक झाली. या बैठकीमध्ये मराठा आरक्षणासंदर्भातील मराठा समाजाच्या नेत्यांकडून काय मागणे आहे हे समजून घेतल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठकीमध्ये एक महिन्याच्या आत तुम्ही सुचवलेल्या मागण्यांवर सरकार विचार करून निर्णय घेणार तसेच एमपीएससी परीक्षा रद्द करण्यासंदर्भातही मुख्यमंत्री सकारात्मक आहेत. त्यामुळे मराठा समाजाकडून करण्यात आलेला महाराष्ट्र बंद तूर्त स्थगित करण्यात आला असल्याची माहिती मराठा समाजाचे नेते सुरेशदादा पाटील यांनी दिली आहे.

COMMENTS