प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या टिकेवर संभाजीराजेंची प्रतिक्रिया ! पाहा

प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या टिकेवर संभाजीराजेंची प्रतिक्रिया ! पाहा

मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल मराठा समन्वय समितीच्या सदस्यांची बैठक बोलवली होती. या बैठकीनंतर छत्रपती संभाजीराजे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही मराठा समाजाच्या प्रमुख मागण्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापुढे मांडल्या. एमपीएससी परीक्षा तसेच भरतीमध्ये मराठा समाज विद्यार्थ्यांना एक वर्ष मुदतवाढ वाढवून देण्यात यावी या मागण्यांसह अनेक मागण्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मांडण्यात आल्या. या मांगण्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सकारात्मक दिसले असून आता ते पुढे काय निर्णय घेतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. त्यामुळे आता मराठा समाज वेट अँड वॉच या भूमिकेत राहणार आहे असे मत बैठक संपल्यानंतर छत्रपती संभाजीराजे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. तसेच प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या टकेवरही संभाजीराजेंनी उत्तर दिलं आहे. पाहा काय म्हणालेत संभाजीराजे…

 

COMMENTS