तिहेरी तलाक प्रतिबंधक विधेयक लोकसभेत सादर !

तिहेरी तलाक प्रतिबंधक विधेयक लोकसभेत सादर !

नवी दिल्ली – मुस्लिमांमध्ये प्रचलित असलेलं तिहेरी तलाक विधेयक लोकसभेत सादर करण्यात आलं आहे. या विधेयकात तिहेरी तलाक हा फौजदारी गुन्हा ठरवून त्यासाठी पतीला तीन वर्षांच्या कारावासाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. केंद्रीय कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी संसदेत हे विधेयक मांडले. पंरतु या विधेयकाला एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी विरोध दर्शवला आहे. या विधेयकामुळे मुस्लिमांवर अन्याय होईल असं ओवैसी यांनी म्हटलं आहे.

दरम्यान लोकसभेत आवाजी मतदान घेण्यात आलं या मतदानानंतर हे विधेयक सादर करण्यात आलं.  या कायद्यात तलाक देण्यात आलेल्या महिलेला व तिच्या मुलांना पोटगी देण्याचीही तरतूद आहे. सर्वोच्च न्यायालयानं ट्रिपल तलाक बेकायदा ठरवूनही तो सुरूच असल्यानं हा कायदा करण्यात येत असल्याचं रविशंकर प्रसाद यांनी म्हटलं आहे. तसेच हा कायदा अस्तित्वात आल्यानंतर पत्नीला तोंडी तलाक देण्याचा प्रयत्न केल्यास गुन्हा दाखल होऊन त्याला तुरुंगवास भोगावा लागणार आहे.

विरोधकांनी विरोध दर्शवल्यानंतर मुस्लिम महिलांवर अन्याय होत असेल तर सरकार गप्प बसणार नाही असं वक्तव्य केंद्रीय कायदामंत्री रविसंकर प्रसाद यांनी व्यक्त केलं आहे. तसेच मुस्लिम महिलांकडून या विधेयकाचं स्वागत करण्यात येत आहे.

 

COMMENTS