उदयनराजेंचा भाजप प्रवेश निश्चित, आज देणार खासदारकीचा राजीनामा?

उदयनराजेंचा भाजप प्रवेश निश्चित, आज देणार खासदारकीचा राजीनामा?

मुंबई – राष्ट्रवादीचे साताऱ्यातील खासदार उदयनराजे यांचा भाजप प्रवेश नक्की झाला आहे. त्यामुळे आज उदयनराजे आपल्या खासदारकीचा राजीनामा देणार असल्याची माहिती आहे. त्यासाठी उदयनराजे आज संध्याकाळी दिल्लीत दाखल होणार आहेत.खासदारकीचा आज राजीनामा दिल्यानंतर उदयनराजे यांचा उद्या भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्य उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश होईल, अशी माहिती आहे.

दरम्यान खासदारकीच्या राजीनाम्यानंतर विधानसभेची आणि लोकसभेची पोटनिवडणूक एकत्र लावण्यासाठी उदयनराजे आग्रही होते. मात्र ही मागणी पूर्ण होत नसल्याने उदयनराजेंच्या भाजप प्रवेशाला विलंब झाला. मात्र आता उदयनराजे भाजपमध्ये जाण्यास तयार झाले असल्याची माहिती आहे. असं असलं तरीही याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.

तसेच काल उदयनराजे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर ते राष्ट्रवादीतच राहतील असं बोललं जात होतं. परंतु उदयनराजेंचं मनपरिवर्तन झालं नसून त्यांनी अखेर भाजपात जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला असल्याचं दिसत आहे.

COMMENTS