पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक मतांनी कोण जिंकणार ?

पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक मतांनी कोण जिंकणार ?

पुणे – लोकसभा निकालाची तारीख 23 मे जसजशी जवळ येत आहे तसतशी उमेदवार, त्यांचे पाठिराखे यांची धाकधूक वाढत आहे. प्रत्येकजण आपआपल्या उमेदवाराच्या विजयाचा दावा करत आहे. मात्र साधारणपणे स्थानिक पत्रकार काही राजकीय अभ्यासक यांचं मत विचारात घेतलं तर यावेळचे निकालाचे अंदाज लावणं तस महाकठीण झालं आहे. काही मोजके अपवाद वगळले तर पश्चिम महाराष्ट्रतले अंदाज बांधणं तसं कठिण झालंय. बहुतेक मतदसंघात मोठ्या मताधिक्याचा कुणीही दावा करत नाही. सगळीकडेच चुरशीच्या लढती झाल्या आहेत.

त्यातही अंदाज लावायचाच झाला तर पश्चिम महाराष्ट्रात पुण्यातून भाजपचे गिरीष बापट हे सर्वाधिक मताधिक्याने जिंकतील असा अंदाज आहे. कारण पुण्यात भाजपची असलेली ताकद, युतीचे झालेले मनोमिलन, गिरीष बापट यांची प्रतिमा आणि काँग्रेसचा तुलनेत कमकुत उमेदवार यामुळे बापट यंदा चांगल्या मताधिक्याने जिंकतील असा अंदाज बांधला जात आहे. गेल्यावेळी पश्चिम महाराष्ट्रात मोठं मताधिक्य मिळवणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे उदयनराजे भोसले यांचं मताधिक्यही यावेळी खूप कमी होईल असा अंदाज आहे.

बापट यांच्या खालोखाल मताधिक्य असेल ते बारामतीमधून सुप्रिया सुळे यांचे. गेल्यावेळी पेक्षा अधिकच्या मताधिक्याने त्या जिंकतील असा अंदाज आहे. तर कोल्हापुरची जागा शिवसेना जिंकेल असा अंदाज आहे. हातकणंगलेमध्ये राजू शेट्टींना कडवी लढत मिळाली आहे. तरीपण ते काठावर का होईना जिंकतील अशी शक्यता आहे. सांगली, मावळ, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, माढा, सोलापूर या मतदारसंघात मात्र कोण जिंकेल याची खात्री देता येत नाही एवढ्या चुरशीच्या लढती झाल्या आहेत.

COMMENTS