अंगणवाडी सेविकांचा तीस-या दिवशीही संप कायम

अंगणवाडी सेविकांचा तीस-या दिवशीही संप कायम

अंगणवाडी सेविकांचा तीस-या दिवशीही बेमुदत संप सुरूच आहे. जोपर्यंत मुख्यमंत्री फडणवीस अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या मानधन वाढीचा निर्णय घेत नाहीत तोपर्यंत संप सुरू राहील. असा निर्णय अंगणवाडी कृती समितीने घेतला आहे. राज्यातील 2 लाख अंगणवाडी सेविका आणि मदतनीस 11 सप्टेंबरपासून बेमुदत गेले आहे.

महिला व बालकल्याण विभागाच्या प्रधान सचिवांबरोबर आज बैठक झाली. या  बैठकीत मानधन वाढीचा प्रस्ताव तयार करण्यात आला.  सेवा ज्येष्ठतेच्या आधारावर अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांना मानधन वाढ देण्याचा प्रस्ताव तयार केला. सरासरी 10500 रुपये मानधन वाढीची मागणी करण्यात आली. हा प्रस्ताव अंगणवाडी कृती समितीला मान्य आहे, मात्र जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत संप मागे घेणार नाही. असे अंगणवाडी कृती समितीने म्हटले आहे.

COMMENTS