अकरावीची प्रवेश प्रक्रिया 22 जूनपासून सुरळीत होईल – विनोद तावडे

अकरावीची प्रवेश प्रक्रिया 22 जूनपासून सुरळीत होईल – विनोद तावडे

अकरावीची ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया 22 जूनपासून सुरू करणार असल्याची घोषणा शिक्षणमंत्री विनोद तावडेंनी केली आहे. अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशासंबंधीचा घोळ मिटवण्यासाठी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत विनोद तावडे बोलत होते.

अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेबाबत ज्या तक्रारी आल्या होत्या, त्या तक्रारींची दखल घेण्यात आलेली आहे. काही ठिकाणी ऑनलाईन प्रवेशाच्यावेळी सर्व्हर हँग झाल्याच्या तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे उद्या एक दिवस ऑनलाईन प्रवेश थांबवण्यात येईल. परवा 22 तारखेला सकाळी 10 वाजता पुन्हा प्रवेश प्रक्रिया सुरू केली जाईल असे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सांगितले आहे.

COMMENTS