अखेर मॉन्सून केरळात दाखल !

अखेर मॉन्सून केरळात दाखल !

बंगालच्या उपसागरावर असलेल्या कमी दाबाच्या पट्टयाचे रूपांतर ‘मोरा’ चक्रीवादळात झाले आहे. येत्या 24 तासांत मान्सून केरळमध्ये दाखल होणार असल्याचे हवामान विभागाने जाहीर केले. त्यानंतर आज  मान्‍सूनचे केरळात  आगमन झाले आहे.

 

हवामान विभागाने 24 तासात केरळच्या दक्षिण किनारपट्‍टीवर मान्‍सून दाखल होणार असल्याचा अंदाज वर्तवला होता. तो तंतोतंत खरा ठरला आहे. मान्‍सून 24 तासात संपूर्ण केरळमध्ये दाखल होईल.  केरळाबरोबरच दक्षिण अरबी समुद्र, मालदीव, तामिळनाडूचा काही भाग, बंगालच्या उपसागरातील आणखी काही भाग, उत्तरपूर्व भारताच्या काही भागात येत्या 24 तासांत प्रवेश करण्याच्या दृष्टीने अनुकूल स्थिती आहे. असा अंदाज होता आणि मान्सून केरळात धडक मारली असून नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

COMMENTS