अखेर विजय माल्ल्याला लंडनमध्ये अटक

अखेर विजय माल्ल्याला लंडनमध्ये अटक

भारतीय बँकांना कोट्यवधींचा चुना लाऊन देश सोडून पळून गेलेला मद्यसम्राट तथा किंगफिशर कंपनीचा अध्यक्ष विजय मल्ल्याला इंग्लंडमध्ये पोलिसानी अटक केल्याची माहिती हाती आली आहे. त्यामुळे विजय माल्ल्या लवकरच भारताच्या ताब्यात मिळण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.

माल्ल्याला ताब्यात घेण्यासाठी सीबीआय टीम लंडनमध्ये जाणार असल्याचेही सांगण्यात येत आहे. माल्ल्याने देशातील बॅंकांना कोट्यवधी रुपयांना फसविले होते. कर्ज घेऊन ते न फेडता लंडनमध्ये आसरा घेतला होता. देशातील बॅंकांचे हजारो कोटी रुपये बुडवून परदेशात पळालेला मद्यसम्राट विजय मल्ल्याला लंडनमध्ये स्कॉटलॅंड पोलिसांनी अटक केली आहे. माल्ल्याला लवकरच लंडन येथील न्यायालयासमोर हजर केले जाईल असेही सांगण्यात येत आहे.

COMMENTS