अजित पवारांचा कोणी केला “पोपट” ?

अजित पवारांचा कोणी केला “पोपट” ?

इंदापूर –  माजी उपमुख्यमंत्री अजित पवार काल पुणे जिल्ह्यातल्या इंदापूरच्या दौ-यावर आले होते. यावेळी त्यांनी त्यांच्या भाषणात आमदार दत्तात्र्यय भरणे यांच्या भाषणाचा संदर्भ देत तुम्ही तुमच्या भाषणात विरोधकांचे फार नाव घेत जाऊ नका असा सल्ला दिला. तसंच माझे अनेक सहकारी मला सोडून गेले हेही सांगितलं.

हे सांगतना त्यांनी बारातमी मतदारसंघातील रंजन तावरे, चंदरराव तावरे, यांच्यासह अनेककांची नावे घेतली. यातल्या प्रत्येकाला काही ना काही हवं होतं. मात्र त्यांना ते मिळालं नाही. त्यामुळे ते सोडून गेले. यावेळी बोलतना आणखी एका सहका-याचा उल्लेख केला. तो म्हणजे पोपटराव तुपे… हे सांगताना त्यांनी माझा पोपट केला असं सांगतात भाषण ऐकण्यासाठी आलेल्यांमध्ये एकच हशा पिकला.

 

COMMENTS