अजित पवारांना उशिराचे शहाणपण !

अजित पवारांना उशिराचे शहाणपण !

नाशिक –  ‘गेल्या 15 वर्षात आघाडी सरकारमध्ये होतो त्यामुळे संघटनेकडे जेवढे लक्ष द्यायला पाहिजे होते तेवढे दिले नाही ही चूक मान्य करतो, त्यानंतर आपसातील कुरबुरी, गटबाजी पक्षात वाढली, आम्ही विविध पद उपभोगली मात्र सर्वसामान्य कार्यकर्ता पदापासून दूर राहिला’. असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी व्यक्त केलं. त्यामुळे उशिरा का होईना अजित पवारांना शहाणपण आले असेचं म्हणावं लागेन.

‘राष्ट्रवादी काँग्रेसची सध्या जी परिस्थती त्यापेक्षा वाईट अवस्था भविष्यात राष्ट्रवादीची होणार नाही. पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांची तत्काळ पक्ष्यातून हकालपट्टी करणार आहे. नुसती घोषणा करून चालणार नाही, घोषणा देऊन पक्ष मोठा होत नाही. शहराध्यक्ष जिल्हाध्यक्ष यांनी आधीआपले वॉर्ड मजबूत करा, पदाधिकारी नगरसेवक निवडून आणावेत. येत्या दोन महिन्यात शहर ग्रामीण कार्यकरणीच्या नेमणुका झाल्या पाहिजे.’ अशी सूचना अजित पवार यांनी पदाधिकारी दिल्या.

अजित पवार यांची राज ठाकरे यांच्यावर टीका

नाशिकचा मतदारांनी विधानसभामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मत दिले नाही, कोणाच्या ध्यानीमनी नसताना मनसेचे तीन आमदार निवडून दिले मात्र त्यांचे इंजिन कधी इकडून तर कधी तिकडून धावले शहराचा विकास झाला नाही.

COMMENTS