कल्याण – राष्ट्रवादी काँग्रेसचा जिल्हा मेळावा आज कल्याणमध्ये झाला. या मेळाव्याला अजित पवार यांच्याशिवाय, सुनील तटकरे, गणेश नाईक, आदी नेते उपस्थित होते. कार्यक्रमात जिल्हाध्यक्ष रमेश हणुमंते यांचं भाषण सुरू होते. ते अमूक मतदारसंघात कोणता भाग येतो. तमूक मतदारसंघात कोणता भाग येतो, असं त्यांच्या जिल्ह्यातल्या मतदारसंघाची माहिती भाषणात देत होते. भाषण सुरू असतानाच अजित पवार यांनी त्यांना थांबवलं. असंलं काय सांगता. कोणता भाग कोणत्या मतदारसंघात येतो हे आम्हाला माहिती आहे. जिल्हाध्यक्ष म्हणून तुम्ही काय केलं ते सांगा? असं सांगितलं. आणि कार्यक्रमाच्या ठिकाणी एकच शांतता पसरली. त्यानंतर पुन्हा जिल्हाध्यक्षांनी आपलं भाषण सुरू केलं. पण लगेच ते संपवलंही…..
COMMENTS