‘हे’ सरकारी अॅप डाऊनलोड करा आणि GST बद्दल काहीही शंका दूर करा !

‘हे’ सरकारी अॅप डाऊनलोड करा आणि GST बद्दल काहीही शंका दूर करा !

देशभरात जीएसटी लागू झाल्यापासून अनेकांच्या मनात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. कोणत्या वस्तूवर किती जीएसटी आणि तो कशा स्वरूपात असणार आहे, याबाबत अनेकांच्या मनात गोंधळ असून, सोशल मीडियावरून प्रसारीत होणाऱ्या अर्धवट माहितीमुळे हा गोंधळ अधिकच वाढत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या मनात असलेला हा गोंधळ दूर करण्यासाठी सेंट्रल बोर्ड ऑफ एक्साइज अँड कस्टमने मोबाइल अॅप लाँच केलं आहे. हे मोबाइल अॅप तुमच्या मनात GST बद्धल असलेल्या सर्व शंकांचे समाधान करणार आहे.

हे अॅप वापरण्यास अत्यंत सुलभ असून वस्तू आणि सेवांच्या कॅटेगरीमध्ये संपूर्ण यादी बघता येईल व कर व अन्य माहिती मिळवता येईल असे सीबीएसईने म्हटले आहे. तसेच जीएसटी म्हणजे काय, त्याचा प्रवास कसा होता, ड्राफ्ट काय आहे, तरतुदी काय आहेत अशा सगळ्या बाबीदेखील अॅपच्या माध्यमातून पोचवण्यात येत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

प्रसारमाध्यमांत आलेल्या माहितीनुसार देशभरातील सवळपास 50 टक्के लोकांना जीएसटीबद्धल माहितीच नाही. त्यामुळे लोकांपर्यंत पोचण्यासाठी हा अॅपचा मार्ग अवलंबण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

COMMENTS