लखनऊमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून मतदानासाठी न आल्याने माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव लखनऊ महापालिकेने मतदार यादीतून वगळण्यात आले आहे. त्यामुळे वाजपेयी यापुढे लखनऊमध्ये होणाऱया कोणत्याही निवडणुकांमध्ये मतदान करु शकणार नाहीत.
मतदारयाद्यांच्या पुनर्निरीक्षण मोहिमेनंतर त्यांचं नाव यादीतून काढून टाकण्यात आल्याचं क्षेत्रीय अधिकारी अशोक कुमार सिंह यांनी स्पष्ट केलं. वाजपेयी उत्तर प्रदेशातील लखनऊ येथील बनारसी दास वॉर्डमधून मतदानाचा हक्क बजावायचे. त्यांनी 2004 च्या लोकसभा निवडणुकीत मतदान केले होते. मात्र त्यानंतर प्रकृती अस्वाथ्यामुळे त्यांना मतदान करता आले नाही.
COMMENTS