अण्णा हजारेंचा शेतकऱ्यांच्या संपाला पाठिंबा

अण्णा हजारेंचा शेतकऱ्यांच्या संपाला पाठिंबा

‘राज्यात 1 जून पासून शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पाठिंबा दिला आहे.  ‘शेतकऱ्यांच्या मागण्या आणि आंदोलन रास्त आहे. मात्र, त्यांनी संयम आणि शांततेच्या मार्गाने आंदोलन केले पाहिजे, असे सांगतानाच, ‘शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ सोबत आल्यास या प्रश्नी मुख्यमंत्र्यांशी बोलण्याची तयारी आहे,’ असे अण्णांनी म्हटले आहे. प्रसिद्धी पत्रकाद्वारे अण्णा हजारे आपली भूमिका मांडली आहे.

COMMENTS