मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज महापलिका मुख्यालयात जाऊन आयुक्त अजोय मेहता यांची भेट घेतली.राज ठाकरे यांनी महापालिका आयुक्त अजॉय मेहता यांची भेट घेऊन फेरीवाल्यांवर त्वरीत कारवाई करण्याबाबतचं निवेदन दिले.
‘महापालिकेनं नागरिकांसाठी काही मोबाईल फोन व्हाट्सअप नंबर जाहीर करावेत. या व्हाट्सअप क्रमांकावर नागरिकांना त्यांच्या विभागातील किंवा रेल्वे स्थानक परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांचे फोटो पाठवता येतील. आणि महापालिकेला फेरीवाल्यांवर नियमित कारवाई करणं तसेच या समस्येवर नियंत्रण मिळवणं सोपे जाईल.’ अश्या काही महत्त्वाच्या सूचनाही राज ठाकरेंनी आयुक्तांना सुचवल्या आहेत.
गेल्या आठवड्यात राज ठाकरे यांनी चर्चगेट येथील पश्चिम रेल्वेच्या प्रशासकीय कार्यालयावर मोर्चा काढला होता. एल्फिस्टन रोड रेल्वे पुलावर झालेल्या दुर्घटनेबाबत त्यांनी प्रशासकीय अधिकाऱयांना जाब विचारला होता. तसेच रेल्वे प्रवाशांच्या अनेक समस्यांही मांडल्या होत्या. रेल्वे पुलांवर धंदा करणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी ठाकरे यांनी प्रशासनाला 15 दिवसांचा अल्टीमेंटम दिलाय. अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलनाचा धमकी वजा इशारा दिलाय.
COMMENTS