पिंपरी-चिंचवड – राज्यातील बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बैलगाडा मालक आणि शौकिनांतर्फे शनिवारी जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांची बैलगाड्यातून छोटी मिरवणुकही काढण्यात आली.
बैलगाडा शर्यतीवरील बंदी हटल्यानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं पिंपरी-चिंचवडमध्ये जंगी स्वागत करण्यात आलं. विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने मुख्यमंत्री पिंपरीच्या दौऱ्यावर होते. बैलगाडी शर्यतीवरील बंदी हटल्यानं स्थानिक भाजप कार्यकर्त्यांनी बैलगाडीतून मुख्यमंत्र्यांची जंगी मिरवणूक काढली. यावेळी मुख्यमंत्र्यांनीच दोर हाती घेत बैलगाडी हाकली. बैलगाडातून काहीअंतर मिरवणूक करण्याची विनंती मुख्यमंत्र्यांना करण्यात आली. मुख्यमंत्री फडणवीस हे देखील उत्साहात बैलगाड्यात बसून सभागृहाच्या प्रवेशद्वारापर्यत आले. मुख्यमंत्र्यांच्या बैलगाड्याचे ‘सारथी’ म्हणून आमदार महेश लांडगे यांनी ‘कासरा’ हातात धरला. यावेळी महापौर नितीन काळजे, भाजप शहराध्यक्ष आणि आमदार लक्ष्मण जगताप यांच्यासह स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
COMMENTS