अन् खासदार उदयनराजे यांना अश्रू अनावर

अन् खासदार उदयनराजे यांना अश्रू अनावर

शहीद जवान रवींद्र धनावडे हे जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवाद्यांशी लढताना शहीद झाले होते. हे वृत्त समजताच मोहाटसह अवघा तालुका शोकसागरात बुडाला. शहीद रविंद्र धनावडे यांचे पार्थिव त्यांच्या घरी मोहाट येथे आला तेव्हा वातावरण गहिवरून गेले होते. गावातील तरूण पोरं मोठयाने रडत होती. 12 वर्षाची श्रद्धा मोकलून रडत होती त्यावेळी तेथे उपस्थित असणाऱ्या उदयनराजेंना श्रद्धाचा हंबरडा पहावत नव्हता, कुटुंबाचा आक्रोश पाहून उदयनराजे ही गलबलून गेले ,त्यांचा संयम संपला आणि त्यांचाही अश्रूचा बांध तुटला. ,श्रद्धाला जवळ घेऊन ताई तू रडू नको ,मी आहे ,काळजी करू नको असे म्हणताना उदयनराजे ढसा ढसा रडू लागले.

‘पाकिस्तान मुर्दाबाद’, ‘अमर रहे अमर रहे रवींद्र धनावडे अमर रहे’,‘भारत माता की जय’,‘वंदे मातरम’, ‘जब तक सूरज चाँद रहेगा, रवींद्र तेरा नाम रहेगा’ अशा गगनभेदी घोषणांच्या आवेशात,  सीआरपीएफ  जवानांच्या तुकडीने बंदुकीच्या फैरींची सलामी दिल्यानंतर  शहीद रवींद्र धनावडे यांना अखेरचा निरोप देण्यात आला.

COMMENTS